Important Updates:
*** Alert : Due date for making payments & submission of monthly/annual returns under PTRC for the FY 2025-26 has been revised to 15th March. 2026. *** *** Facility to File F-704 Online is now made available to dealers w.e.f. 23-02-2026. Please login to file online. For any help regarding F-704 please call on 022-23786697 or Helpdesk email ID for resolution of the issue *** *** e-CST Declaration now available (Download Manual) *** *** Refund Facility is available for dealers from 03.02.2026 *** *** PT Reset Password User Manual *** *** PTRC Return - Month of Oct and Nov 2025 is available for filing Please login with credentials. *** *** Exemption from payment of late fee u/s. 20(6) of MVAT Act, 2002 for filing of returns for the period of October 2025, November 2025 and u/s. 6(3) of the PT Act, 1975 for filing of returns for the period of November 2025. *** *** सेवानिवृत्त राज्यकर सहायक आयुक्त गट-अ व समकक्ष गट-अ अधिकारी (वेतनस्तर एस-25 पेक्षा कमी) यांची करारपद्धतीने नियुक्ती *** *** VAT-CST-PT return extension Trade Circular 17T of 2025 dated 01.12.2025 *** *** Reset Password User Manual *** *** महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या नवीन संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत... सदर संकेतस्थळाचे नूतनीकरण सुरू असल्याने काही मर्यादित सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत, उर्वरीत सेवा लवकरच उपलब्ध होतील याची नोंद घ्यावी..तसदी बद्दल क्षमस्व...!! ***
वस्तू व सेवा कर विभाग
महाराष्ट्र शासन
कर भरा, राष्ट्र घडवा
6925021771248576_Hon_ble-removebg-preview.png
Processing...

About RTS


लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ विषयी

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015

 

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.

वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे:- https://aaplesarkar.mahaonline.gov.in

;